जिल्ह्यातील ह्या तालुक्यात सलग तीन दिवस जोरदार पाउस !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यात गुरूवार पासून सलग तीन दिवस तालुक्यातील आढळगाव, मांडवगण, घोडेगाव, बेलवंडीसह शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

तीनही दिवस सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारनंतर जोरदार वारे सूरू होउन ढग गडगडायला लागून थेंबथेंब पावसाला सुरुवात होऊन काही वेळातच जोरदार पाऊस सुरू झाला.

सुमारे १ तास मुसळधार पाउस झाला पाऊस थांबल्यानंतर वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. मान्सून चा पाऊस वेळेवर सुरुवात झाल्यानें शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून

खरिपाची पेरणी करण्याकरिता लगबग सुरू झाली आहे. तर आंबा, लिंबू, या फळ उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाली.मान्सूनचा पाऊस चांगल्या प्रकारे सुरू झाला असून

शेतकऱ्यांनी घाई न करता खरिपाची पेरणी १० जून किंवा २० – २५ मिली मीटर पाऊस झाल्या नंतर तसेच बीज प्रक्रिया करून करावी अशी प्रतिक्रिया तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिली.

तसेच पावसाची नोंदी बाबत विचारले असता त्यांनी पावसाची नोंद ही जिल्हा पातळीवर आहे. ती आम्ही मागितली आहे असे सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24