IMD Alert : ‘या’ राज्यांमध्ये आज कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Alert : देशभरात पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला आहे. तरीही अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असण्याची शक्यता वर्तवली आहे. ही राज्ये नेमकी कोणती आहेत पाहुयात.

हवामान खात्याने आजही डोंगराळ भागात बर्फवृष्टीसह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. अंदाजानुसार आज गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बऱ्याच भागात बर्फवृष्टी आणि पाऊस पडू शकतो.

मागील अनेक दिवसांपासून या भागात तुरळक हिमवृष्टी आणि पावसामुळे संपूर्ण परिसरात तापमानात मोठी घट नोंदवली आहे. त्यामुळे पारा शून्याच्या खाली घसरून मायनसवर पोहोचला आहे.

याचबरोबर डोंगरावरील बर्फवृष्टीचा परिणाम मैदानी भागात दिसून येतोय. मैदानी राज्यांमध्ये थंडी वाढत आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तर, मध्य भारतासह देशातील अनेक भागांमध्ये तापमान सतत कमी होत आहे.

पर्वतीय भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये थंडी वाढली आहे आणि येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढू शकते.

अंदाजानुसार आज दिल्ली-एनसीआरमध्ये हवामान स्वच्छ राहील तर सूर्यास्तानंतर थंडी आणखी वाढू शकते. दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये अजूनही पाऊस पडत आहे. त्याचबरोबर हवामान खात्याने तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटांसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

उत्तर अंदमान समुद्रावर नवीन चक्रीवादळ निर्माण होऊ शकते. असे झाल्यास आजूबाजूच्या परिसराचे हवामान बदलेल. त्याचबरोबर, पुढचे चार ते पाच दिवस ओडिशाचे किमान तापमान तीन ते पाच अंशांनी कमी होईल.

खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट हवामानानुसार दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. आंध्र प्रदेश, तामिळनाडूचा काही भाग, गोवा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात हलका पाऊस पडू शकतो. त्याशिवाय देशातील इतर भागात हवामान कोरडे राहील.