Maharashtra Rain Alert : ब्रेकिंग ! 18 अन 19 ऑगस्टला महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार, तुमच्या जिल्ह्यात पडणार का पाऊस ? पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या 15 ते 16 दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. खरंतर यावर्षी मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता यामुळे अनेक भागात पेरण्या देखील उशिराने झाल्या आहेत. जून महिन्यात राज्यात अपेक्षित असा पाऊस पडला नाही. असं म्हणण्यापेक्षा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा वगळता राज्यात दुसरीकडे पाऊसच झाला नाही.

जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. यामुळे यंदा दुष्काळच पडणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटतं होती. विशेष म्हणजे एलनिनोमुळे यंदा कमी पाऊस पडणार असे अनेक हवामान तज्ञांकडून सांगितले जात होते. यामुळे यंदा दुष्काळ पडणार म्हणजे पडणार अशा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगल्या होत्या. मात्र तसे काही झाले नाही जुलै महिन्यात राज्यात जोरदार पाऊस झाला.

राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र मधील जवळपास सर्वच जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. अनेक जिल्ह्यात तर अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. यामुळे राज्यातील अनेक भागात सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते तर काही भागातील शेती पिकांना याचा मोठा फटका देखील बसला होता. परंतु जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान पाहायला मिळत होते.

पण आता गेल्या 15 ते 16 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून आता पाऊस केव्हा बरसणार हाच प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अशातच हवामान विभागाने 18 ऑगस्ट पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असा महत्त्वाचा हवामान अंदाज नुकताच जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात पावसासाठी पोषक हवामान नव्हते, यामुळे राज्यात आजही पावसाने उघडीप दिली होती तर काही ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळाला.

विशेष बाब म्हणजे हवामान विभागाने काल-परवाच आज हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. यानुसार आज राज्यातील काही भागात हलका पाऊस पाहायला मिळाला आहे. मात्र आता उद्यापासून मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या अर्थातच 17 ऑगस्टला अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही उद्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात हलका पाऊस पडणार असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त 18 आणि 19 ऑगस्ट रोजी राज्यातील विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली या 11 जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या 5 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

या 16 जिल्ह्यात 18 आणि 19 ऑगस्टला जोरदार पाऊस होणार असा अंदाज असून या संबंधित जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील अर्थातच खानदेश मधील जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासाठी देखील आयएमडीने येलो अलर्ट दिला आहे. पण राज्याच्या इतर भागांत ठिकठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज आहे.