अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर झाड कोसळले.त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता.
शुक्रवारी सकाळी उशिरा हे झाड बाजूला करण्यात आले त्यावेळी वाहतुक सुरळीत झाली. वादळी पावसामुळे या मार्गावर झाडे किंवा झाडाच्या फांद्या भर रस्त्यावर कोसळण्याच्या अनेकवेळा घटना घडल्या आहेत.
दरम्यान या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत.एप्रिल महिन्यातच हे काम सुरू होणार होते.
मात्र अद्यापही कार्यवाही झाली नाही.मात्र या रस्त्याच्या कडेला असलेल्या श्रीरामपूर येथील वेशीपासून बेलापूर (कोल्हार चौक) पर्यंतच्या सुमारे ३०० अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
अतिक्रमण धारकांना रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजुने १५ मिटरचे अंतर निश्चित करण्यात आले आहे.नोटिसा मिळाल्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र काही जण पुढील कारवाईची वाट पाहत आहेत.