अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं हवामानाचा अंदाज जारी केला आहे. कमोरिन आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र आता लक्षद्वीप आणि अरबी समद्राकडे सरकलं आहे.
येत्या तीन दिवसांमध्ये हवामान प्रणाली तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्रातमध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सातारा,
सिंधुदुर्ग, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांना ३ नोव्हेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना ४ नोव्हेंबर यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.
याशिवाय ७ नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.