धरण क्षेत्रात मुसळधार ! गोदावरी धरणातील पाणीसाठा 75 टक्क्यांवर पोहचला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- गंगापूरच्या पाणलोटात बुधवारी दिवसभर काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. काल सकाळी 75 टक्क्यांवर पोहचलेले हे धरण काल सायंकाळी 5 वाजता 76.45 टक्क्यांवर पोहचले होते. रात्रीतुन हा साठा 80 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.

त्यामुळे आज गुरुवारी या धरणातून 500 क्युसेक ने विसर्ग सोडण्यात येणार आहे. टप्याटप्याने या विसर्गात वाढ होऊ शकते. दुसरीकडे दारणाच्या पाणलोटातही काल दिवसभर अधुनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे दारणाचा घटविलेला विसर्ग पुन्हा 3196 क्युसेक करण्यात आला.

दारणा काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत 76 टक्क्यांवर पोहचले होते. आज सकाळी 6 पर्यंत ते 80 टक्क्यांपर्यंत पोहचलेले असेल. त्यामुळे आज गुरुवारी सकाळी 10 वाजता गंगापूर मधून विसर्ग सोडण्यास सुरुवात होणार आहे.गोदावरीतून 3357 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

गंगापूर मधील विसर्गाचे पाणी नाशिक शहरातुन जात असल्याने सतर्कता बाळगत हळुहळू विसर्ग वाढविण्यात येवु शकतो. 5630 क्षमतेच्या या धरणात 4304 दलघफू पाणीसाठा झाला होता.

दारणााचा साठा 78.14 टक्के स्थिर ठेवुन नविन येणार्‍या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. भावलीतून 481 क्युसेक ने तर काल सकाळी 6 पर्यंत 100 टक्के भरलेल्या वालदेवीतुन 65 क्युसेकने विसर्ग सुरु झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24