राज्यातील ‘ह्या’ ११ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-विदर्भात मागील दीड महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे शेतकरी चिंतातून झाला आहे; मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकांची नासाडी सुरू झाली.

मात्र, आगामी दिवसांमध्ये विदर्भातील 11 जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भात तर हवामान खात्याने ‘येला अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. आज नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली,

अकोला अशा एकूण 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. कालही याच भागात हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला होता. आजही याठिकाणी हीच स्थिती कायम आहे. संबंधित अकरा जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

आज संबंधित जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आकशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून मराठवाड्याचा चांगल्या पावसाची आतुरता लागली आहे.

खानदेश आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. आहे. मराठावाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या आठ जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होण्याचं प्रमाण अधिक असणार आहे.

या ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. संबंधित आठ जिल्ह्यांमध्ये सायंकाळनंतर एक-दोन ठिकाणी हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24