ताज्या बातम्या

भारतात लॉन्च झाली ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  दुचाकी प्रेमींसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे. Ignitron Motocorp ने भारतात हाय स्पीड इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक Cyborg GT-120 लॉन्च केली आहे. ही बाईक ब्लॅक आणि डार्क पर्पल अशा दोन कलरमध्ये उपलब्ध आहे.

आकर्षक फीचर्स जाणून घ्या या बाईकमध्ये 4.68 kWH लिथियम-आयन बॅटरी आहे. जी 180 किमीची रेंज देते. नवीन Cyborg GT 120 तीन राइडिंग मोडसह उपलब्ध आहे. या बाईकमध्ये तुम्हाला जिओ लोकेट / जिओ फेन्सिंग, बॅटरी स्टेटस, यूएसबी चार्जिंग, ब्लूटूथ, कीलेस इग्निशन आणि डिजिटल क्लस्टर यांसारखी अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतील.

कंपनी असा दावा करते की ही बाईक 2.5 सेकंदात 0 ते 40 किमी धावू शकते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कोमाकी रेंजर इलेक्ट्रिक क्रूझर, रिव्हॉल्ट आरव्ही 400 आणि टॉर्क क्रॅटोस यांसारख्या इलेक्ट्रिक बाइक्सशी या बाईकची स्पर्धा होऊ शकते.

स्पेसिफिकेशन या बाईकच्या पुढच्या बाजूला डिस्क ब्रेकसह कॉम्बी ब्रेक सिस्टम (CBS)आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंग देण्यात आलं आहे. क्लस्टरमध्ये एक LED डिस्प्ले आहे, जो रायडरला उर्वरित बॅटरी लाइफ देखील दर्शवतो. डिस्प्लेला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP65 रेट केले आहे.

किंमत? याची मोटार, बॅटरी आणि बाईकवर 5 वर्षांची वॉरंटी दिली आहे. या बाईकची भारतातील किंमत आणि बुकिंगचे डिटेल्स पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

Ahmednagarlive24 Office