गरजूंच्या दारोदारी व पालावर उदरनिर्वाहासाठी पोहचली युवानची मदत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- वाढत चाललेली टाळेबंदी, श्रमिक, कष्टकरी व हातावर पोट असलेल्यांचा गंभीर बनत चाललेला उदरनिर्वाहाचा प्रश्‍न,

दिवस भागवाताना दोन वेळच्या जेवणाची पडणारी भ्रांत अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना युवान या सामाजिक संस्थेने १००० गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले.

कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी मिळालेल्या जीवनावश्यक मदतीने वंचिताच्या चेहर्‍यावर समाधान उमटले. युवान कोविड मदत कार्याअंतर्गत (फेज 2) शहर व नगर तालुक्यातील एक हजार गरजू कुटुंबीयांना ही मदत देण्यात आली.

पोलीस मुख्यालय येथे शहर पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांच्या हस्ते झोपडपट्टी भागातील नागरिकांना किराणा किटचे वाटप करुन या मदत अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी युवानच्या स्वयंसेवकांनी शहरातील रामवाडी, शिवाजीनगर, श्रमिकनगर, तोफखाना, स्टेशन रोड, भिंगार, यशवंत नगर, सैनिकनगर, मुकुंदनगर, फकीरवाडा, सिद्धार्थनगर, ठाणगे मळा, बोल्हेगाव, एम.आय.डी.सी. आदी भागात गरजूंना ही मदत पोहचवली.

तसेच निरीक्षण गृह, आठरे पाटील बालगृह, घारगाव आश्रमशाळा, माऊली, घर-घर लंगर सेवा, वंचित वसती, जामखेड रोड वरील गोसावी समाजाचे पाल आदी सामाजिक संस्था, संघटना आणि शहरा जवळील पालावर देखील ही मदत देण्यात आली.

पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांनी कोरोनाच्या संकटकाळात खर्‍या गरजूंना मदत पोहचविण्याचे काम युवानने केले आहे. टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या श्रमिकांचा प्रश्‍न बिकट बनला आहे. स्वयंसेवी संघटना कोरोनाच्या लढ्यात योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे त्यांनी सांगितले.

युवानचे संस्थापक संदीप कुसळकर यांनी टाळेबंदीत सर्व काही बंद झाले असताना कुटुंबाला दोन घास जेवण मिळावे या भावनेने अनेक गरजू कुटुंब अपेक्षेने पहात आहे. त्यांचे हिरमुसलेले चेहर्‍यावर समाधान देण्यासाठी व त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मदत पोहचविण्यात आली असल्याचे सांगितले.

यावेळी युवानचे संस्थापक संदीप कुसळकर, सुरेश मैड, रुपेश झंवर, हेमंत लोहगावकर, टेक महिंद्राचे कल्पना दिवाडकर, संदीप पंडीत, नितीन कानडे, चिम्मयी हिरवे, अंकुश बहिरट, इम्रान अलमेल, दिपक नाईक,

नगरसेवक अप्पा नळकांडे, अ‍ॅड. धनंजय जाधव, डॉ. रिजवान अहमद, संजय दळवी आदी उपस्थित होते. ही मदत पोहचविण्यासाठी स्वयंसेवक रुपेश पसपूल,

सतीश बोरुडे, रामदास गायकवाड, सोनू बोरुडे, विजय म्याना, श्रीनिवास, संभाजी मोहिते, अजय जाधव, प्रवीण नरके, शंकर कदम, दशरथ देवरे, दीपक लोखंडे, योगेश परदेशी आदींनी परिश्रम घेतले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24