ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरु जिल्हास्तरीय मार्गदर्शन कक्षही कार्यान्वित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारस सरकार यांचे मार्फत देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 या क्रमांकाने राष्ट्रीय हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे.

तसेच येथील सहायक आयुक्त समाज कल्याण, अहमदनगर या कार्यालयात जिल्हास्तरावर ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी दिली. जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या या कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक 0241-2329378 असा आहे.

तसेच समाज कल्याण कार्यालय हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून 5 ते 6 कि.मी. अंतरावर असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीचे होण्यासाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, अहमदनगर पिस फौन्डेशन, अहमदनगर व उर्जिता सोशल फौन्डेशन,

अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आधार जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक कक्ष शहराच्या मध्यवर्ती तारकपूर बस स्टँड समोरील उर्जिता सोशल फौन्डेशनच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलाआहे. या जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक 7276622763 असा आहे.

सहायक आयुक्त समाजकल्याण, अहमदनगर कार्यालय, जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन कक्ष व आधार जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक कक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करणे. आरोग्य विषयक सुविधांसाठी आरोग्य विभागाबरोराबर समन्वय राखणे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजना व सोई-सुविधा यांची माहिती व त्यांना सदर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणे. वृध्द व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत कुटुंबाचे प्रबोधन करणे. निराधार व निराश्रीत वृध्दांना निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्य करणे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विषयक विविध शिबिराचे आयोजन करणे व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे. ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2007 अंतर्गत तक्रारीचे निवारण करणे. ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन व मदत करणे. ज्येष्ठ नागरिकांना समुपदेशन सेवा उपलब्ध करुन देणे.

संकट काळात आवश्यक सहाय्य व पोलीस सहाय्य करण्यासाठी समन्वय करणे. आदी उपक्रम राबविण्ययात येत आहे. अहमदनगर जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, अहमदनगर,

जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन कक्ष व आधार जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक कक्षात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी यांचे निराकरण करुन विविध उपाययोजना करण्यात येत असून सदर जिल्हास्तरीय ज्येष्ठ नागरिक कक्षात राबविण्यात येणा-या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. देवढे यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24