विजेच्या एका ठिणगीने तिचा संसार झाला बेचिराख…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- डोक्यावरील पतीचे छत्र हरपलेल्या एका निराधार महिलेच्या घराला आग लागल्याने तिचा संसार काही क्षणात बेचिराख झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली आहे.

दरम्यान ग्रामस्थांच्या सहकार्याने आग विझविण्याचा प्रयत्न झाला, मात्र तोपर्यंत आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुमन निवृत्ती परहर या कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे राहता.

पतीच्या निधनानंतर सुमनबाईंनी मोठ्या कष्टातून संसार उभा केला होता. मात्र यांच्या घराला बुधवारी दुपारी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. घराला लागलेल्या आगीत साठवून ठेवलेले धान्य, कागदपत्रे, कपडे, भांडी, रोख रक्कम, पशुखाद्य आदी जळून खाक झाले.

त्यामुळे या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. तलाठ्याने जळीताचा पंचनामा केला आहे. पतीच्या निधनाचे दुःख पचवून सुमनबाईंनी मोठ्या कष्टातून संसार उभा केला.

अचानक झालेल्या दुर्घटनेने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24