इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत ५ गैरसमज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता सद्यःस्थितीत पर्यायी इंधनाकडे भारताला झपाट्याने वळावे लागेल असे मत नुकतेच केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केले.

देशात अतिरिक्त वीजनिर्मिती होत असल्याने इलेक्ट्रिक ऊर्जेकडे वळण्याचे लक्ष्य लवकरच साध्य होऊ शकते असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. मागील काही कालावधीत देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासंदर्भात जागरूकता निर्माण होत असली तर त्यांच्या मनात आजही काही गैरसमज घर करून आहेत.सदर लेखात हेच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

१. ईव्ही चार्ज करण्यासाठी वेळ लागतो :- इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणा-या नागरिकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे ईव्ही चार्ज करण्यासाठी खूप तास लागतात. परंतु एखादा उत्तम पार्किंग लॉट किंवा गॅरेज असेल तर बेसिक २४०व्ही पॉवर आउटलेटसह, दररोज रात्री ईव्हीज चार्ज केल्या जाऊ शकतात.

त्यामुळे पेट्रोल पंप किंवा सीएनजी स्टेशनवरील लांब रांगा टाळता येतील. तसेच एकदा भारतीय महामार्गांवर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विकसित झाल्यावर लांब पल्ल्यावर गाडी चालवणे अधिक सुलभ होईल. सध्याचे सुपरचार्जर ३० ते ६० मिनिटात पूर्ण चार्ज करून देतात.

उदा. एमजीचे फास्ट चार्जिंग ५० मिनिटात झेडएस ईव्ही ०%-८०% वर टॉपअप करते. एखाद्या ठिकाणी थांबून जेवण करण्याचा हा वेळ आहे. अनेक कंपन्या त्यांच्या पार्किंगच्या जागेतच चार्जिंग स्टेशन बनवण्याबाबत विचार करीत आहेत. ईव्हीसाठी पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने त्या जोरदारपणे काम करत आहेत.

२. ईव्ही किफायतशीर नसतात :- यात फार आश्चर्यकारक असे काही नाही. कारण नवीन तंत्रज्ञानानुसार सर्वसाधारण घडामोडींचे हे द्योतक आहे. आजच्या लक्झरी बाजारात बहुतांश ईव्ही उच्च किंमतीला उपलब्ध आहेत. मात्र या स्थितीत वेगाने बदल होत आहे.

विशेषत: भारतात सबसिडीद्वारे किंमती कमी केल्या जातात व त्या अधिकाधिक खरेदी करण्याजोग्या ठेवल्या जातात. अमेरिकेच्या फास्ट चेक आउटनुसार ईव्हीची सरासरी किंमत ही पेट्रोलवरील कारच्या निम्म्यापेक्षा जास्त असेल. अधिक प्रभावी कूलिंग सिस्टिम व सामान्य वाहनांच्या तुलनेत ईव्हीजमध्ये बदलणारे पार्ट्स थोडेच असल्याने त्यांची देखभालही स्वस्त असेल.

यात ऑइलदेखील वापरले जात नाही. विविध कारनिर्मात्या कंपन्या निश्चित पुनर्विक्री मूल्य सुविधादेखील प्रदान करीत असून एमजी मोटर्सने झेडएस ईव्हीकरिता कारदेखो डॉटकॉमसोबत भागीदारी केली आहे. कारदेखो डॉटकॉम झेडएस ईव्हीची तीन वर्षे मालकी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना ५०% च्या अवशिष्ट किंमतीवर बायबॅकची हमी प्रदान करते.

३. ईव्ही बॅटरी महाग असतात व वारंवार बदलण्याची गरज असते :- लिथियम-आयन बॅटरींची किंमत भरपूर कमी होत आहे. उच्च कार्यक्षमतेच्या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यावर भारताचे लक्ष आहे. सध्याच्या ईव्ही बॅटरी २४१,००० किमी धावल्यानंतर ९०% क्षमता दर्शवतात.

सामान्य भारतीय चालक उपरोक्त अंतरही पार करत नाहीत. जे हे अंतर पूर्ण करतात ईव्ही कंपन्या त्यांना ८ वर्षांच्या बॅटरीची गॅरेंटी देतात. जसे की एमजी झेड एस ईव्ही ८ वर्ष/ १,५०,००० किमीची वॉरंटी प्रदान करते.

४. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी ईव्ही उपयुक्त नाहीत :- ईव्ही स्वीकारण्याचे प्रमाण कमी असण्यामागील आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे हे वाहन एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी योग्य नाही, अशी समजूत. मात्र नव्या काळातील जागतिक स्तरावरील इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये अत्यंत कार्यक्षम बॅटरीज असून

त्या ३०० किलोमीटर अंतरावरील प्रवासाची हमी देतात. येणा-या कालावधीत ईव्ही बाजारात जागतिक स्तरावरील लीडर्सचा प्रवेश अपेक्षित असून सध्याच्या बाजाराला गती मिळण्याची अपेक्षा आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालेल्या ईव्हीजचे ते स्थानिकीकरण करतात.

त्यामुळे भारतातील स्थानिक ग्राहकांच्या मागण्या त्याद्वारे अधिक चांगल्या पद्धतीने पुरवल्या जाऊ शकतात. तसेच चार्जिंग स्टेशनवर सरकारचा भर वाढत आहे ज्यामुळे दूरचा पल्ला गाठणे सहज शक्य होईल.

५. ईव्हीचा वेग कमी असतो :- याआधीही बहुतांश इलेक्ट्रिक वाहनांबाबतची ही सामान्य धारणा होती. पण इलेक्ट्रिक कारचीही स्पर्धा असते हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. ईव्ही संपूर्ण टॉर्कचे रुपांतर करू शकतात,जे द्रुतगतीचा परिणाम प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

कंझ्युमर वाहनांमध्येही ईव्हीज २.५ सेकंदात ०-९६ किमी प्रति तास वेग धारण करू शकतात. उदा. एमजी झेडएस ईव्ही ०-१०० किमी/प्रति तास केवळ ८.५ सेकंदात कव्हर करू शकते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24