अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-आनंदी आयुष्यासाठी सेक्स हा एक महत्त्वाचा भाग असतो. सुखद आणि प्रसन्न सेक्ससाठी ऊर्जा देखील गरजेची असते. परंतु हे सर्व करत असताना अनेक गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे असते.
पहिल्यांदा सेक्स करताना जोडप्यांमधले अवघडलेपण, भीती किंवा बुजरेपणा यांमुळे परिस्थिती बिघडू शकते. यासाठी आधी दोघांची सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचा विचार व्हायला पाहिजे. प्रत्येकालाच पार्टनरसोबत पहिल्यांदा संबंध प्रस्थापित करताना अवघडल्यासारखे वाटते.
पहिल्या सेक्स अनुभवाबद्दल प्रत्येकाच्याच काही आशा, अपेक्षा आणि कल्पना असतात. मात्र वास्तव बर्याचदा वेगळं असतं. जोडप्यांमधलं अवघडलेपण, भीती किंवा बुजरेपणा यांमुळे परिस्थिती बिघडू शकते. म्हणूनच पहिल्या सेक्सच्यावेळी कसे वागले पाहिजे ते जाणून घेऊयात –
कंडोम विसरू नका :- पहिल्यांदा सेक्स करताना सुरक्षादेखील महत्त्वाची आहे. बरेच पुरूष उत्साहाच्या भरात सुरक्षेचा विचार करतच नाहीत, परिणामी लैंगिक आजार किंवा अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच कंडोम जरूर बाळगा.
– सेक्सच्या आधी रूममधील वातावरण रोमँटिक करा. लाइट रोमँटिक म्युझिक रूममधील वातावरण आल्हाददायक बनवण्यात मदत करेल. या व्यतिरिक्त तुम्ही अॅरोमा कँडलचा वापर करू शकता. यामुळे रूम सुगंधित होईल.
– पहिल्यांदा सेक्स करताना आपल्या पार्टनरचे मोकळ्या मनाने भरभरून कौतुक करा. पार्टनरचा ड्रेस, हेअर स्टाइल, बोलण्याची स्टाइल, मेकअप इ. गोष्टींचे कौतुक केल्याने पार्टनर स्वतःहून तुमच्या जवळ येईल.
– सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी दोघांमध्ये संवाद होणे फार गरजेचे आहे. सेक्स करण्याआधी कम्फर्टेबल होण्यासाठी फोरप्ले करा. पार्टनरच्या त्या ठराविक जागा शिधून काढा जिथे स्पर्श केल्याने पार्टनर सुखावेल.
– काही वेळेस पहिल्यांदा सेक्स करताना त्रास होण्याची शक्यता असते. तुमचे शिश्न संवेदनशील असू शकते किंवा कदाचित तुमच्या साथीदाराला वेदना होऊ शकतात. पहिल्या सेक्सच्या वेळेस वेदना होणे हे अगदी सामान्य आहे. दर पाच पैकी एका स्त्रीला असा त्रास होतोच. बर्याचदा शुष्क योनीमार्गामुळे हा त्रास होऊ शकतो म्हणूनच योग्य ती काळजी घ्या.
– पहिल्यांदा संभोग करताना स्त्रीयांमध्ये रक्तस्त्राव होतोच हा गैरसमज आहे. पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक स्त्रीला रक्तस्त्राव होतोच असे काही नाही. कारण स्त्रीच्या योनीमार्गाच्या मुखाशी असलेला ‘हायमेन’ नामक अतिशय नाजुक पडदा धावणे, सायकल चालवणे, उड्या मारणे किंवा अगदी स्विमिंग सारख्या व्यायाम प्रकारातूनही अगदी सहज फाटू शकतो. तर काही जणींमध्ये हा पडदा जन्मजातच नसतो. त्यामुळे रक्तस्त्रावाचा स्त्रीच्या पावित्र्याशी संबंध लावणे टाळा.