अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- ‘देवमाणूस’ या क्राईम थ्रिलर मालिकेनं १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानांतर प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगली ती म्हणजे ‘देवमाणूस’च्या दुसऱ्या भागाची.
अखेर प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आणि नुकतंच ‘देवमाणूस’ या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार असल्याची बातमी मिळाली. झी मराठी वाहिनीसोबतच सोशल मीडियावर ‘देवमाणूस’च्या दुसऱ्या सिझनच्या प्रोमोची झलक प्रेक्षकांनी पाहिली.
आता या मालिकेच्या प्रमोशनसाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहदेखील मैदानात उतरला आहे. रणवीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओलाही चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हिडिओमध्ये या मालिकेला फीट बसणारा एक डायलॉग रणवीर म्हणाताना दिसत आहे. रणवीर सिंह म्हणतो की, ‘‘अख्खा पब्लिक को मालूम है, कौन आनेवाला है, तेरेको नही मालूम…” सूर्यवंशी सिनेमातील रणवीरचा हा डायलॉग चांगलाच फेमस होत आहे.
‘देवमाणूस’ मालिकेत डिम्पलची भूमिका साकारणाऱ्या अस्मितानं हा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. अस्मितानं हा व्हिडिओ शेअर करत ‘देवमाणूस २’ इन ‘सूर्यवंशी स्टाईल’ अशी कमेंट केली आहे. हा व्हिडिओ प्रेक्षकांनाही खूप आवडला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी मालिकेची वाट पाहत असल्याची कमेंट केली आहे.