अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- आपण ‘बजेट’ हा शब्द ऐकतो तेव्हा हे कुणातरी अर्थतज्ञाचे काम आहे, असेच वाटते. पण स्वत:साठीचे बजेट तयार करताना एवढ्या खोलात जाण्याची गरज नाही.
खरं तर आपली आर्थिक उद्दिष्टे साधण्याची पहिली पायरी म्हणजेच बजेट तयार करणे होय. वैयक्तिक बजेटचे नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय.
तुमचे एकूण उत्पन्न निश्चित करा :- तुम्ही मासिक तत्त्वावर निश्चित किती पैसे कमावता, जाणून घेण्याची पहिली पायरी असते. यात तुमच्या प्रत्येक स्रोताचा समावेश होतो.
पगार, लाभांश, व्याज इत्यादी. तुमचे ग्रॉस नव्हे तर नेट उत्पन्न मोजा. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, कर कपातीनंतर मिळणारे उत्पन्न मोजा.
तुमच्या खर्चाचा आढावा घ्या :- हलक्या वाऱ्याच्या झोतासोबत तुमचा पैसा कसा सहजपणे नष्ट होतो, हे पाहून आश्चर्य वाटते ना? पण असे घडणे तुम्ही थांबवू शकतात. आपल्या खर्चाचा सतत मागोवा घेतला पाहिजे.
तुमचा मासिक खर्च युटिलिटी, अन्न, प्रवास इत्यादीसारख्या गटांमध्ये वर्गीकृत करा. आणखी एक चांगली कल्पना म्हणजे बजेटिंगचे अॅप स्मार्टफोनवर डाऊनलोड करा.
तुमचा खर्च कितीही कमी असला तरी त्यावर अपडेट करता येईल, याची खात्री करा. असे केल्याने तुम्हाला प्रत्येक खर्चावर नजर ठेवता येईल. त्यानुसार आवश्यक ते व्यवस्थापन करता येईल.
तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा :- तुम्ही पुढील प्रक्रियेला सामोरे जाण्यापूर्वी आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा. तुम्हाला भविष्यासाठी म्हणजे सुट्या, मुलांचे शिक्षण, लग्न इत्यादींसाठी पैशांची बचत करायची आहे का,हे पहा.
एकदा वित्तीय उद्दिष्टे निश्चित झाली की, पुढील प्रक्रिया करता येते. मग ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महिन्याला किती पैसा वाचवायचा, याचीही कल्पना येते.
महसूलाचे अतिरिक्त स्रोत शोधायला शिका :- तुमच्या बजेटमध्ये काही प्रतिकुल स्थितीचीही तयारी ठेवावी लागते. त्यामुळे महसूलाचे इतर मार्ग शोधण्याचा मार्ग चांगला आहे. ऑफिसच्या वेळाव्यतिरिक्त अजून काम करायचे नसेल तर,
तुमच्या पैशांचा वापर करूनच असा मार्ग शोधा. एक गुंतवणूकदार म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक मार्ग खुले आहेत, ज्याद्वारे फायदा होऊन ते उच्च उत्पन्न मिळवून देतात. (म्हणजेच त्यांच्यातन सहजपणे पैसा कमावता येऊ शकतो.)
उदा. :-
शेअर बाजारात गुंतवणूक करणे, हे आता एका क्लिकवर शक्य झाले आहे. तुम्हाला केवळ शिफारशींच्या इंजिनासमवेत चालावे लागते. काही शिफारस इंजिन तर एका शेअरची शिफारस करण्यापूर्वी कोट्यवधी डेटा पॉइंट्सचे मूल्यांकन करतात.तुम्हाला अधिक सखोल जाणून घ्यायचे असल्यास, इतरही अनेक प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही आणखी माहिती मिळवू शकता. पण सतत अनेक प्लॅटफॉर्म्स पाहत राहण्याने गोंधळाची स्थिती निर्माण होईल,
असे तुम्हाला वाटते का? मग त्याचीही गरज नाही. कारण काही पूर्ण सेवा देणारे भारतातील डिजिटल ब्रोकर्स सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतात.
तुमच्या बजेटला धरून रहा :- तुम्ही किती योजना आखली, यापेक्षा महत्त्वाचे आहे की, तुम्ही ती किती अंमलात आणली. अन्यथा कागदावरील योजना व्यर्थ जाईल.
अल्पकालीन व दीर्घकालीन अशा दोन्ही आर्थिक उद्दिष्टांवर नजर ठेवा. हे कठीण जात असेल तर तुम्ही बिलाची पद्धती म्हणजेच इन्व्हलप सिस्टिमचाही वापर करू शकता.