ताज्या बातम्या

Hero Electric NYX E5 : बाजारात लॉन्च झाली सिंगल चार्जमध्ये 210 किमी रेंज देणारी Hero Electric NYX E5 इलेक्ट्रिक स्कूटर, पहा किंमत

Published by
Ahmednagarlive24 Office

Hero Electric NYX E5 : देशात दिवसेंदिवस इंधनाच्या किंमत वाढत आहेत. त्यामुळे अनेकजण पेट्रोल किंवा डिझेलवरील वाहने खरेदी करत नाहीत. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू लागली आहेत.

मागणी आणि गरज लक्षात घेता अनेक दिग्ग्ज कंपन्या आता आपली इलेक्ट्रिक वाहने सादर करू लागली आहेत. परंतु, याच्या किमतीही जास्त आहेत. अशातच हिरोने आपली नवीन स्कुटर NYX E5 लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 210 किमी रेंज देत आहे.

आज ईव्ही मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, तुम्हाला माहित आहे का? की अशा अनेक इलेक्ट्रिक स्कूटर आहेत ज्या DL शिवाय म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय चालवल्या जातात. Hero Electric NYX E5 ही एक कमी बजेटची इलेक्ट्रिक स्कूटर असून ती RTO मंजूर नाही.

हिरो इलेक्ट्रिक NYX E5

Hero ने ही इलेक्ट्रिक स्कूटर परवडणाऱ्या किमतीत बाजारात दाखल केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेकांना ही इलेक्ट्रिक स्कूटर पसंत आली आहे.

जाणून घ्या बॅटरी आणि टॉप स्पीड

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये उत्तम 51.2V/30Ah लिथियम आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. इतकेच नाही तर या बॅटरीमध्ये 250W ची मोटर जोडली आहे.

तसेच ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये सुमारे 85 किमीची मोठी रेंज देण्याची शक्यता आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त एका सामान्य चार्जरने केवळ 4 ते 5 तासांत पूर्ण चार्ज होईल. त्याचा टॉप स्पीड सुमारे 25 किलोमीटर प्रति तास आहे.

जाणून घ्या स्मार्ट फीचर्स

यात उत्तम फीचर्सचा वापर केला आहे. यात ब्रिलियंट एलईडी लाइट, एलईडी डिस्प्ले, स्पीडोमीटर, ओडोमीटर, यूएसबी सॉकेट, अंडर सीट स्टोरेज अशी अनेक स्मार्ट फीचर्स कंपनीने दिली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही स्कुटर चावीशिवाय अनलॉक होते. तसेच ही नवीन स्कूटर तुम्हाला चोरांपासून वाचवेल.

जाणून घ्या किंमत

केवळ 67,440 रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये लॉन्च केली आहे. तसेच ही कंपनीच्या परवडणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे.

Ahmednagarlive24 Office