नायक ! मला 24 तासांसाठी मुख्यमंत्री करा; बिचकुलेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- बिग बॉस फेम अभिजित बिचुकले नेहमी आपल्या काही बेताल विधानासाठी प्रसिद्ध आहेत.

दरम्यान आता अभिजित बिचुकले यांनी उद्धव ठाकरेंकडे एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तशा आशयाचं पत्रच अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल आहे. उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा तरी द्या अन्यथा सक्तीच्या रजेवर जा.

तुमचे सर्व मंत्री निष्क्रिय आहेत. मला 8 मार्च या महिला दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री करा. सर्व प्रशासनातील सगळ्यांना सुतासारखं सरळ करतो,

असे पत्र अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं. नायक चित्रपटातील अनिल कपूरसारखेच अभिजित बिचुकलेंनी एक दिवस मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीय.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात बिचकुले म्हणाले कि, लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे कुटुंबप्रमुख आहात आणि गेल्या वर्षभर आपणच आपल्या बंगल्यातून बाहेर येत नाही.

गेल्या दहा महिने लॉकडाऊन करून आपण कोरोनाला प्रतिबंध केला, असे भासवत असला तरी सर्वसामान्य जनता, श्रमिक,

कष्टकरी शेतकरी आणि विशेष करून आम्हा कलाकारांवर उपासमारीची वेळ आणली आहे, हे विसरून चालणार नाही. राज्याची मला आस्था असल्याने बेरोजगार, उद्योजक,

शेतकरी, कलाकार आणि हातावरचे पोट असलेल्या सर्व लोकांची मला आस्था असल्याने मी पोटतिडकीने आपल्याला सांगू इच्छितो आहे.

ज्या प्रकारे आपण मुख्यमंत्री झालात त्याच प्रकारे जनतेच्या सेवेसाठी आपण मला एक दिवस स्वच्छेने राजीनामा देऊन किंवा सक्तीच्या रजेवर जाऊन मला फक्त एक दिवस मुख्यमंत्रिपदावर नियुक्त करा.

मग बघा मी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो बघा, असे मत बिचुकलेंनी पत्रात व्यक्त केलंय.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24