अरे बापरे: पोलिसांच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलाची आत्महत्या..?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :-  चक्क पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका अल्पवयीन मुलाने स्वतःचे जीवन यात्रा संपवली, असल्याची धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे घडली. आदित्य अरूण भोंगळे (वय-१६ ) असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोटरसायकल चोरी व देसी पिस्टलच्या गुन्ह्यांमध्ये कुठलाही संबंध नसताना आपल्याला या गुन्ह्यांमध्ये पोलिसांकडून पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे आदित्यने आपल्या आईला सांगितले होते. त्यानंतर पोलिसांकडून आपल्याला पैशाची मागणी होत असल्याचेही त्याने घरच्यांना सांगितले होते.

त्यासाठी त्यांनी काही पैसेही पोलिसांना दिले, परंतु आपली बदनामी होईल या भीतीने आदित्य भोंगळे यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली असा आरोप आदित्यच्या घरच्यांनी केला आहे. त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा उद्देशाने अनेक वेळा पैशाची मागणी झाली अशी माहिती त्याची आई संगीता अरुण भोंगळे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी संतप्त नातेवाईकांकडून मृतदेह शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आला होता, दरम्यान पोलिसांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

शेवगाव पोलिसांच्या समोरच अंत्यविधी करण्यात येणार होता, परंतु शेवगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी आपण तपास करून पोलिसांवर कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह गावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office