अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पॉझिटिव्ह निघालेले अनेक रुग्ण घरीच होमक्वॉरंटाईन होत आहेत.
मात्र यावेळी घरी त्यांच्या संपर्कात येणारे कुटुंबातील अनेक व्यक्ती बाहेर बिनधास्तपणे फिरतात.यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा मोठा धोका असतो.
त्यामुळे होमक्वॉरंटाईन ही पद्धतच नको. असे स्पष्ट मत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले आहे. पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे कोविड सेंटरच्या उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, सध्या देशासह राज्य व जिल्ह्यात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. यापूर्वी याचे शहरी भागात जास्त प्रमाण होते.
मात्र आता ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येते आहेत. आज सौम्य लक्षणे असलेली अनेकजण होमक्वॉरंटाईन आहेत.
मात्र त्यांच्या संपर्कात आलेली घरातील इतर सदस्य बाहेर फिरतात परिणामी इतरांनाही बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पॉझिटिव आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्याची गरज आहे.
त्याठिकाणी त्यांच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार झाले तर निश्चितपणे रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील जनतेने देखील विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन कर्डिले यांनी यावेळी केले.