हाय अलर्ट ! येत्या 24 तासात ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार कोसळणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्रात येत्या 24 तासांमध्ये काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम आहे.

दिवसभरात मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आजही राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर एका जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे. यातच यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलडाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात बुलडाणा, अकोला, वाशिम, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 20 ऑगस्टला अमरावती आणि नागपूरला यलो अलर्ट देण्यात आलाय. तर, उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24