सलमान खानला उच्च न्यायालयाने धाडली नोटीस… हे आहे कारण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- बाॅलिवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेल्या सलमान खानला पुन्हा न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. सलमान खानला नोटीस बजावत हायकोर्टानं भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी मनाई करण्यात आलेल्या कमाल खाननं कोर्टाच्या निर्देशांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर खुलासा करण्याचे निर्देश हायकोर्टानं सलानला दिले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून सलमान खान आणि कमाल आर खान यांच्यात वाद रंगलेला दिसत आहे. सलमानच्या ‘राधे’ या सिनेमासह सलमानच्या व्यक्तिगत आयुष्यात, व्यावसायिक आयुष्यातील घडामोडी आणि अन्य सर्वच बाबतीत कमाल खाननं अनेकदा वादग्रस्त पोस्ट समाज माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत.

त्यानंतर आता हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. कमालच्या वादग्रस्त पोस्टवर आक्षेप घेत सलमानने दिवाणी सत्र न्यायालयात कमाल खान विरुद्ध याचिका दाखल केली होती. कमालच्या पोस्टमुळे चित्रपटांना निगेटिव्ह रिव्हीव मिळाला.

त्यामुळे कमालला कोणतीही पोस्ट लिहिण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी सलमानने केली होती. सलमान खानच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान दिवाणी सत्र न्यायालयाने सलमानच्या बाजूने निकाल दिला.

दरम्यान, या प्रकरणावर आपली बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयाचं हजर राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत. दोन आठवड्यानंतर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

Ahmednagarlive24 Office