अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- इस्लामाबाद कराचीहून सुमारे २१५ किलोमीटर अंतरावरील मटियारी जिल्ह्यात एका हिंदू महिलेचे पोलिसांसमोरूनच लग्नाच्या मंडपातून हल्लेखोरांनी अपहरण केले.
मिळालेल्या माहितीनुसार या २४ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचे जबरदस्तीने धर्मांतर करून मुस्लिम व्यक्तीसोबत तिचा विवाह लावण्यात आला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या मुलीचे लग्न हाला शहरातील एका हिंदू व्यक्तीसोबत होणार होते. मात्र, काही हल्लेखोर मंडपात दाखल झाले आणि त्यांनी तिचे अपहरण केले.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचा विवाह समारंभ सुरू होता तेव्हाच शाहरुख गुल नावाचा हल्लेखोर काही जणांसोबत पोलिस घेऊन आला आणि त्यांनी त्यांच्या मुलीचे दिवसा अपहरण केले.
नंतर तिला मुस्लिम धर्म स्वीकारायला लावून त्याबाबतचे दस्तऐवज आणि शाहरुखसोबत लग्न केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.
त्या तरुणीने १ डिसेंबर २०१९ रोजीच मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे दस्तऐवजात दिसते. प्रमाणपत्रानुसार तिने मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर नाव बदलले आहे.