अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- महाविकास आघाडीसरकार मधील मंत्री विकासकामे सोडुन खंडणी गोळा करण्याचे काम करत आहेत. तर काहींवर महिलांवरील अत्याचारा सारखे गंभीर आरोप झालेले आहेत. तरी देखील या निगरगट्ट सरकारला जाग येत नाही.
अशी टीका भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांवर वाढत चाललेले अत्याचार आणि यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या भ्रष्टाचारी सरकाराविरोधात आ. बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने श्रीगोंदा शनीचौक येथे आंदोलन केले.
यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र यांनी नैतीक जबाबदारी स्विकारून राजीनामा देण्याची मागणी केली.
तसेच जनतेच्या मनातील भावना ओळखुन भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. यांनी राजीनामा न दिल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आ. पाचपुते यांनी दिला.