अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश प्रकिया लक्षात घेता पुणे, वाघोली येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड रिसर्च या महाविद्यालयाच्यावतीने 12 वी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘इंजिनिअररिंग आणि करिअर ऑप्शनस्’ या ऑनलाईन मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे,

अशी माहिती संचालक ऋषीकेश सावंत यांनी दिली. कोरोनाची सद्यस्थिती पाहता संस्थापक सचिव डॉ.ना.तानाजीराव सावंत यांनी ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. सदर कार्यशाळा दि.20, 21 व 22 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वा. मदत केंद्राच्या स्वरुपात राबविण्यात येणार आहे.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. इच्छूकांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी https://tinyuri.com/jspmbsiotr या लिंकवर रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा. अधिक माहितीसाठी समन्वय प्रा.विवेक मोहिते मो.9881302055, प्रा. विशाल पुराणिक मो.9423772655 यांच्याशी संपर्क साधावा,

असे आवाहन संचालक डॉ.सचिन आदमाने व प्राचार्य डॉ.टि.के.नागराज यांनी केले आहे. ही कार्यशाळा अत्याधुनिक ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेतील व्याख्याने महाविद्यालयाच्या युट्युब चॅनलद्वारे वारंवार पाहता येतील. या संधीचा लाभ शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावा.

या मदत केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेशाची माहिती, प्रवेशासाठी लागणारी गादपत्रे तसेच महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणार्‍या विविध स्कॉलरशिप योजनांची माहिती ऑनलाईन मिटिंगद्वारे विद्यार्थ्यांना आणि पालकांना देण्याचा उपक्रम या महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमामध्ये इंजिनिअरंगच्या विविध शाखांची माहिती, उपलब्ध नोकरीच्या संधी याबद्दल विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रियेत येणार्‍या विविध अडचणी आणि त्याबद्दलची घ्यावयाची काळजी यांचे मार्गदर्शन देखील तज्ञांमार्फत देण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांच्या सर्व शंकांचे निरसन या उपक्रमात करण्यात येणार आहे.