ताज्या बातम्या

जुनी पेंशन रद्द करण्याच्या अध्यादेशाची शिक्षकांकडून होळी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- राज्य शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. यामुळे ५० हजार शिक्षकांवर व कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. या कायद्याच्या विरोधात अनेकदा आंदोलने केली.

मात्र शासनाला अद्याप जाग आलेली नाहीये. याचा निषेध म्हणून शासनाच्या अध्यादेशाची होळी करत आहोत. संपूर्ण शिक्षकांमध्ये संताप वाढत आहे.

जर शासनाने त्वरित निर्णय बदलला नाहीतर संपूर्ण राज्यात अति तीव्र आंदोलन शिक्षक परिषद करणार आहे, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू यांनी दिला.

यावेळी नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रा.सुनील पंडित, महानगर अध्यक्ष सखाराम गारुडकर, संघटन मंत्री विठ्ठल ढगे, विना अनुदानित शाळा संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पवार, पूजा चौधरी, सत्यवान थोरे, बाबासाहेब बोडखे, सुनील सुसरे आदींसह जिल्ह्यातून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी शासनाच्या विरोधात उपस्थित शिक्षकांनी जोरदार घोषण देत निषेद केला. जुनी पेंशन रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधीकारींनी नगरमध्ये राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली गांधी मैदान येथे जिल्हास्तरीय एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाच्या अध्यादेशाची होळी केली.

यावेळी प्रा.सुनील पंडित म्हणाले, ३१ ऑक्टोबर हा दिवस शिक्षकांसाठी काळा दिवस आहे. २००५ साली आजच्याच दिवशी शासनाने जुनी पेंशन रद्द करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे.

राज्यातील हजारो शिक्षक व कर्मचारी आज शासनाचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करत आहेत. महाराष्ट राज्य शिक्षक परिषद सर्व शिक्षकांना एकत्र करून त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Ahmednagarlive24 Office