मद्यप्रेमींचा खोळंबा होऊ नये म्हणून देशातील ‘या’ राज्यात घरपोहच मद्यविक्री सेवा सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान तळीरामांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारने देखील थोडी तसदी घेतली आहे. यामुळे अनेक वेबसाईट किंवा ऍप ग्राहकांना घरपोच दारू उपलब्ध करून देत आहेत.

२०१९-२० या आर्थिक वर्षात दारूच्या विक्रीतून देशातील सर्व राज्यांनी मिळवलेला एकूण महसूल जवळपास २.२५ लाख कोटी रुपये इतका होता. बहुतांश राज्य सरकारांना दारूच्या विक्रीतून मोठा कर मिळत असतो. त्यामुळे हा निर्णय घेतण्यात आला आहे.

तर आज आपण जाणून घेऊयात कि भारतात घरपोच मद्य डिलिव्हरीला कोणकोणत्या राज्यांनी परवानगी दिली आहे. केरळ – केरळ सरकारने राज्यात दारूच्या होम डिलिव्हरीची सुविधा सुरू करण्यास परवानगी देत दारूच्या सर्व स्थानिक दुकाने आणि बार बंद केले आहेत.

ओडिशा- ओडिशा राज्यातील नागरिक दारूची होम डिलिव्हरी हवी असल्यास आपल्या राज्याच्या बेवरेज कॉर्पोरेशन लि.च्या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर देऊ शकतात. तसेच फूड डिलिव्हरी करणाऱ्यांच्या माध्यमातून दारूची होम डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र – महाराष्ट्र सरकारने देखील राज्यात दारूच्या दुकानांना होम डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. अर्थात नागरिकांना दारूच्या दुकानांवर जाण्याची आणि दारू विकत घेण्याची परवानगी नाही.

छत्तीसगड – छत्तीसगड सरकारने १० मे पासून राज्यात दारूची ऑनलाईन डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. ही सुविधा घेण्यासाठी छत्तीसगडमधील लोकांना सीएसएमसीएल ऍप डाऊनलोड करावे लागेल.

कर्नाटक – मागील महिन्यात कर्नाटक सरकारनेदेखील पहिल्यांदाच दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. पंजाब- पंजाब सरकारने दारूच्या दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अर्थात राज्य सरकारच्या सूचनांनुसार दारूची दुकाने फक्त संध्याकाळी ५ वाजेपर्यतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे.

झारखंड – झारखंड सरकारने मागील वर्षी मे महिन्यात दारूच्या विक्रीला परवानगी दिली होती. झोमॅटो आणि स्विगी या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांना दारूची होम डिलिव्हरी करण्याचा परवाना मिळाला होता. मात्र झोमॅटो या व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडली असून स्विगीने या क्षेत्रातील आपली सर्व्हिस सुरू ठेवली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24