Home Loan : रेपो रेटमध्ये वाढ ! 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांच कर्ज असेल तर आता ‘इतका’ वाढणार EMI ; समजून घ्या संपूर्ण गणित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan:  सर्वसामान्यांना धक्का देत एक वर्षात सलग पाचव्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे आता गृह कर्जावरील EMI देखील वाढणार आहे.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो आरबीआयने रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. यामुळे आता रेपो दर 5.9 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाला आहे.  या वाढीमुळे गृहकर्जधारकांचा ईएमआयचा बोजा वाढणार आहे. चला तर जाणून घ्या कोणाला किती जास्त EMI भरावा लागेल.

रेपो दरात सलग पाचव्यांदा वाढ 

मे महिन्यात पहिल्यांदाच रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. ही वाढ अचानक झाली. त्यानंतर, जून-ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सलग तीन वेळा 50-50 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली.

डिसेंबरमधील ही सलग पाचवी वाढ आहे. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची पुढील बैठक 6 ते 8 फेब्रुवारी 2023 दरम्यान होणार आहे. त्यामुळे रेपो दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

30 लाखांच्या गृहकर्जावर गणित

समजा तुम्ही 30 लाखांचे कर्ज घेतले आहे. एप्रिल 2022 पर्यंत रेपो दर 4 टक्के होता. त्यावेळी गृहकर्जाचा सरासरी दर सुमारे 6.75 टक्के होता. EMI कॅल्क्युलेटरनुसार, 20 वर्षांच्या कालावधीच्या कर्जासाठी दरमहा EMI 22811 रुपये प्रति महिना होता. आता रेपो रेट 2.25 टक्क्यांनी वाढल्याने, सरासरी गृहकर्ज दर 9 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आता 20 वर्षांसाठी त्याच गृहकर्जासाठी मासिक ईएमआय 26992 रुपये झाला आहे.

home loan for a new house

गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये सुमारे 18 टक्क्यांनी वाढ झाली आहेअशाप्रकारे, आठ महिन्यांत, 30 लाख रुपयांच्या गृहकर्जावरील मासिक ईएमआयमध्ये सुमारे 4,200 रुपयांची वाढ झाली आहे. एप्रिल 2022 च्या तुलनेत, जानेवारी 2023 मध्ये गृहकर्ज EMI मध्ये सुमारे 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर गृहकर्जाची मुदत 30 वर्षे असेल तर सरासरी EMI सुमारे 24 टक्क्यांनी वाढेल.

हे पण वाचा :-  Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरवर भन्नाट ऑफर ! फक्त 1 रुपयात मिळणार ‘ही’ मोठी सुविधा ; वाचा सविस्तर