गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्या – चंद्रकांत पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे.

या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केली.

राजकीय आशीर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्था स्थिती धोक्यात आल्याची टीकाही पाटील यांनी केली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी भाजपाने आवाज उठवला. त्यावेळी सरकार पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत होते, पण आता एनआयएच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

पोलीसच उद्योगपतीला धमकी देण्यासाठी स्फोटके ठेवत असतील तर जनतेने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाल्याचे पाटील म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24