ताज्या बातम्या

गृहमंत्री वळसे पाटील यांना दुसऱ्यांदा करोनाचा संसर्ग

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

त्यांनी स्वत: सोशल मीडियातून याची माहिती दिली आहे. त्यांना संसर्ग होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात त्यांना संसर्ग झाला होता.

वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, ‘करोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे.

नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास करोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व करोना नियमांचे काटेकोर पालन करावे.’

गेल्यावर्षी २९ ऑक्टोबरला वळसे पाटील यांना करोनाची लागण झाली होती. दैनंदिन कामकाजासाठी सकाळी ते मंत्रालयात उपस्थित होते. अहवाल येताच ते घरी परतले होते. त्यावेळीही त्यांनी ट्वीट करत माहिती दिली होती.

Ahmednagarlive24 Office