Honda Activa 6G H Smart : यापेक्षा स्वस्त काहीही नाही! 10,000 रुपयात घरी न्या ‘ही’ सर्वाधिक विक्री करणारी होंडाची नवीन स्कुटर

Published by
Ahmednagarlive24 Office

Honda Activa 6G H Smart : काही दिवसांपूर्वी होंडाने आपल्या ग्राहकांसाठी भारतीय बाजारात Honda Activa 6G H Smart लाँच केली आहे. या स्कुटरची किंमत 82,234 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ही किंमत ऑन-रोड झाल्यानंतर 99,508 रुपये आहे.

शिवाय या स्कुटरला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला ही स्कुटर खरेदी करायची असेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही कंपनीची स्कुटर केवळ 10,000 रुपये भरून खरेदी करू शकता.

जाणून घ्या किंमत

हे लक्षात घ्या की Honda Activa 6G H Smart हा या स्कूटरचा टॉप व्हेरिएंट असून ज्याची सुरुवातीची किंमत 82,234 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आणि ही किंमत ऑन-रोड झाल्यानंतर 99,508 रुपये इतकी जाते.

फायनान्स प्लॅन

जर तुम्ही Activa H Smart कॅश पेमेंट मोडमध्ये खरेदी केली तर तुमचे बजेट 1 लाख रुपये इतके पाहिजे. समजा तुमच्याकडे इतके बजेट नसेल, तर तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे अवघ्या 10,000 रुपये भरून ही स्कूटर खरेदी करू शकता. कॅल्क्युलेटरच्या गणनेनुसार, तुमच्याकडे ही स्कूटर खरेदी करण्यासाठी 10,000 रुपये असतील तर बँकेकडून 89,508 रुपयांचे कर्ज जारी केले जाईल. ज्यावर वार्षिक 9.7 टक्के व्याज आकारण्यात येईल.

जर तुम्हाला Honda Activa 6G H-Smart वर कर्ज मंजूर झाले तर तुम्हाला 10,000 रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुढील तीन वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला रु. 2,876 चा मासिक EMI जमा करावा लागणार आहे. जाणून घेऊयात या स्कुटरचे फीचर्स, मायलेज आणि बरेच काही…

फीचर्स

Honda Activa 6G H Smart च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला स्मार्ट की, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ACG सह सायलेंट स्टार्ट, इंजिन स्टार्ट स्विच, रिमोट स्टार्ट, LED टेल लाईट, LED हेडलाइट, LED टर्न सिग्नल लॅम्प इत्यादी फीचर्स मिळतील.

इंजिन

होंडाकडून या स्कुटरमध्ये सिंगल सिलेंडर 109.51 cc इंजिन देण्यात आले आहे, जे फॅन कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित 4 स्ट्रोक SI इंजिन असून ते 8000 rpm वर 7.84 PS ची पॉवर आणि 5500 rpm वर 8.90 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. स्कुटरच्या या इंजिनसोबत CVT ट्रान्समिशन दिले आहे.

मायलेज

मायलेजबाबत, कंपनीचा असा दावा आहे की Activa चे मायलेज 60 किलोमीटर प्रति लिटर असून ते ARAI ने प्रमाणित केले आहे.

Ahmednagarlive24 Office