Honda City Facelift : मार्केटमध्ये लवकरच लाँच होणार Honda City Facelift, जाणून घ्या फीचर्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Honda City Facelift : होंडा ही एक कार तयार करणारी जपानी कंपनी आहे. कंपनी सतत आपल्या कार्स अपडेट करत असते. अशातच ही कंपनी नवीन मॉडेल लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीचे नवीन मॉडेल या वर्षी म्हणजे एप्रिलपूर्वी भारतीय बाजारपेठेत लाँच करू शकते.

भारतीय बाजारात लवकरच Honda City Facelift हे नवीन मॉडेल आपल्याला धुमाकूळ घालताना दिसेल. तसेच कंपनीने यात शानदार फीचर्स दिली आहेत. त्यामुळे हे मॉडेल इतर दिग्ग्ज कार कंपन्यांना टक्कर देईल. कंपनीच्या या नवीन मॉडेलमध्ये खूप बदल करण्यात आले आहेत.

टीझर झाला रिलीज

नुकताच कंपनीने आपल्या नवीन SUV चा पहिला टीझर रिलीज केला आहे, जो 2023 च्या उन्हाळ्यात जागतिक स्तरावर पदार्पण करेल. नवीन Honda SUV ची रचना Honda R&D एशिया पॅसिफिक येथे केली आहे.

दरम्यान जुलै 2020 मध्ये पाचव्या पिढीची Honda City भारतात लॉन्च झाली होती. मात्र, चौथ्या पिढीतील होंडा सिटी बंद न करता हे मॉडेल सादर केले आहे. दोन्ही मॉडेल्स अजूनही देशात विकल्या जातात.

विकले जात आहे हे मॉडेल

ही कंपनी सध्या City E: HEV (हायब्रिड), सिटी (5वी पिढी आणि 4थी पिढी), Amaze, WR-V आणि Jazz भारतीय बाजारपेठेत विकत आहे. 1 एप्रिल रोजी रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नियम लागू होण्यापूर्वी कंपनी पाचव्या पिढीचे सिटी डिझेल, चौथ्या पिढीचे सिटी, WR-V आणि Jazz ची विक्री थांबवणार आहे.

बंद होणार डिझेल इंजिन

पाचव्या पिढीची होंडा सिटी फेसलिफ्ट एका नवीन अवतारात सादर करण्यात येणार आहे. यामध्ये दोन इंजिन पर्याय असणार आहेत. तर 1.5-लीटर i-VTEC पेट्रोल (121PS/145Nm) आणि 1.5-लीटर i-DTEC डिझेल (100PS/200Nm) यांचा समावेश आहे. पेट्रोल इंजिन 6-स्पीड MT किंवा CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले असून डिझेल इंजिनला स्वयंचलित ट्रांसमिशन पर्याय मिळत नाही. ते फक्त 6-स्पीड एमटीसह उपलब्ध आहे. हे लक्षात घ्या की होंडा सिटी फेसलिफ्टमध्ये फक्त पेट्रोल इंजिन उपलब्ध असणार आहे.

जाणून घ्या किंमत आणि कोणाला टक्कर देणार

होंडा सिटी ची किंमत 11.87 लाख ते रु.15.62 लाख, एक्स-शोरूम दिल्ली आहे. स्कोडा स्लाव्हिया, फोक्सवॅगन व्हरटस, ह्युंदाई वेर्ना आणि मारुती सुझुकी सियाझ या कंपन्यांना त्याच्या सेगमेंटमध्ये टक्कर देते. होंडा सिटी फेसलिफ्टची किंमत सध्या विकल्या जात असलेल्या आवृत्तीपेक्षा थोडीशी जास्त असू शकते.

Ahmednagarlive24 Office