Honda SUV : ग्रँड विटाराला टक्कर देणाऱ्या होंडाच्या नवीन मध्यम आकाराच्या SUV चे बुकिंग सुरु, ‘इतक्या’ किमतीत खरेदी करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honda SUV: भारतीय ऑटो बाजारात होंडाच्या सर्वच कार चांगल्याच थैमान घालत असतात. कंपनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवनवीन कार लाँच करत असते. अशातच आता ही कंपनी नवीन मध्यम आकाराची SUV सादर करणार आहे.

या नवीन कारचे बुकिंग सध्या सुरु झाले आहे. लाँच झाल्यानंतर कंपनीची नवीन कार ग्रँड विटाराला कडवी टक्कर देईल. या कारचा कंपनीने काही दिवसांपूर्वी टीझर जारी केला होता. कंपनीची आगामी कार दोन इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय असणार नाव?

कंपनीच्या नवीन Honda SUV चे नाव “The Elevate” असू शकते. यामागचे कारण म्हणजे हे नाव कंपनीकडून देशात अगोदरच नोंदणीकृत करण्यात आले आहे. परंतु अजूनही त्याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नाही. हे नवीन मॉडेल पाचव्या पिढीच्या होंडा सिटी सेडान प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. हे मॉडेल कंपनीच्या राजस्थानमधील तपुकारा प्लांटमध्ये तयार केले जाणार आहे. एप्रिल 2023 पर्यंत कंपनीची उत्पादन क्षमता दररोज 540 युनिट्सवरून 660 युनिट्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट कंपनीचे आहे.

जाणून घ्या इंजिन आणि गिअरबॉक्स

आगामी SUV दोन इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाऊ शकते. एक म्हणजे 1.5-लीटर iVTEC पेट्रोल आणि दुसरे म्हणजे 1.5-लीटर ऍटकिन्सन सायकल e:HEV हायब्रिड तंत्रज्ञानासह येऊ शकते. हे पेट्रोल इंजिन 121 bhp पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करू शकते तर, हायब्रिड इंजिन 126 bhp चा एकत्रित पॉवर आउटपुट आणि 253 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

डिझाइन आणि इंटिरियर जाणून घ्या

टीझरमध्ये असे दिसून आले आहे की नवीन SUV ग्लोबल-स्पेक CR-V आणि HR-V वर काही स्टाइलिंग प्रभाव पाहतील. नवीन SUV च्या फ्रंट फॅशियामध्ये सिग्नेचर लोगोसह मल्टी-स्लॅट ग्रिल, LED DRL सह एलईडी हेडलॅम्प, वर्तुळाकार फॉग लॅम्प, कूप सारखी टेपरिंग रूफ, आकर्षक क्लेडिंगसह फ्लेर्ड व्हील कमानी असणार आहे.

तिची लांबी सुमारे 4.2 ते 4.3 मीटर असणार आहे. आगामी एसयूव्हीचे इंटीरियर काय असेल, त्याचे तपशील याची माहिती सजूनही समोर आलेले नाही. परंतु ग्लोबल एकॉर्ड आणि सिव्हिक द्वारे प्रेरित अधिक आधुनिक केबिन मिळू शकते. इतकेच नाही तर यात मोठी फ्रीस्टँडिंग टचस्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल असणार आहे.

पहा वैशिष्ट्ये

आगामी ADAS (Advanced Driver Assistance System) तंत्रज्ञानासह येऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीकडून ते होंडा सिटी सेडानमध्ये अगोदरच देण्यात आले आहे. यात अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट सिस्टम, रोड डिपार्चर मिटिगेशन, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टीम आणि ऑटो हाय बीम यांसारखी जबरदस्त फीचर्स असणार आहेत. या कारच्या सुरक्षिततेसाठी, SUV ला 6 एअरबॅग, ESC, VSM, हिल लॉन्च असिस्ट, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, लेन वॉच सिस्टम आणि 360-डिग्री कॅमेरा मिळू शकतो.