अहमदनगर जिल्ह्यातील त्या हनीट्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! केवळ पैशासाठी…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून एका अधिकाऱ्याकडे तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे.

प्रेमाचे आमिष दाखवून अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून एका महिलेने तिच्या साथीदारांसोबत एका अधिकाऱ्याकडे ही खंडणी मागतली आहे. महिलेने अधिकाऱ्यासोबत प्रेमाचा बनाव केला आणि त्यानंतर अश्लील व्हिडीओ क्लिप तयार केली.

महिलेने संबंधित अधिकाऱ्याकडे तब्बल 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली. या तक्रारीवरून 1 महिला आणि 4 पुरुष अशा 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या महिलेने यापूर्वी देखील एका व्यावसायिकाला अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात अडकवून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

दरम्यान पोलिसांनी महिला आणि तिचे 2 साथीदार अमोल मोरे आणि सचिन खेसे यांना अटक केली आहे. दरम्यान हनीट्रॅप करणाऱ्या ह्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर यातील आरोपींची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पैशांचा हव्यास आणि गुन्हेगारी प्रवृत्तींच्या तरुणांना हेरून या महिलेने स्वत:ची एक टोळीच तयार केली होती. आणि त्यानंतर तिच्या बंगल्यात आलेल्या पुरुषांचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना दमदाटी व मारहाण करत पैसे उकळणे, अशी जबाबदारी या तरुणांवर होती.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले महेश बागले आणि सागर खरमाळे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अमोल मोरे याचे केडगाव चौकात किराणा दुकान असून

तो आरोपी महिलेचा खास पंटर आहे. सचिन खेसे याचेही नगर तालुक्यातील हमीदपूर येथे किराणा दुकान आहे. महिलेच्या जाळ्यात अडकलेला क्लासवन अधिकारी हा हमीदपूर येथीलच आहे. हे चौघे अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते.

२६ एप्रिल रोजी या महिलेने व्यावसायिकाला घरी बोलविल्यानंतर त्याचे अमोल मोरे याने व्हिडिओ चित्रीकरण केले. एक मे रोजी अधिकाऱ्याला अडकविण्यात महेश बागले, सागर खरमाळे व सचिन खेसे यांचा सहभाग होता.

महिलेच्या बंगल्यात आलेल्या पुरुषाला सदर महिला शरीर संबंध करण्यास भाग पाडायची. यावेळी घरातील जिन्यात व बाथरूममध्ये लपून असलेले तिचे साथीदार अश्लील व्हिडीओ चित्रीकरण करायचे. व्हिडिओ पूर्ण होताच त्या व्यक्तीवर हे तरुण हल्ला करून त्याच्याकडील पैसे व दागिने हिसकावून घ्यायचे.

क्लासवन अधिकार्‍यालाही प्रेमाच्या जाळ्यात ओढत तरुणीने त्यांच्याविरोधात पुरावे गोळा केले. त्यानंतर त्यांनाही ब्लॅकमेल करण्यात आले. इज्जतीला घाबरून या साहेबांनी त्या तरुणीला लाखात रक्कमही दिली. ही रक्कम देताना काही व्यवहार हे ऑनलाईनही झाले आहेत.

त्याचाही पोलिस तपास करत आहेत. दरम्यान अटक केलेल्या तिघांना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून उर्वरित फरार असलेल्या 2 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच या महिलेने आणखी कोणाकोणाला अशा प्रकारे ब्लॅकमेल केले आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24