Honor Play 40 Plus : 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह लॉन्च झाला हा जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Honor Play 40 Plus : टेक कंपनी Honor ने आपला नवीन स्मार्टफोन Honor Play 40 Plus बाजारात (Market) लॉन्च (Launch) केला आहे. हा फोन 6 GB + 128 GB आणि 8 GB + 256 GB अशा दोन प्रकारांमध्ये येतो. हा फोन नुकताच चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

त्याची सुरुवातीची किंमत (Price) 1199 युआन (सुमारे 13,800 रुपये) आहे. चीनमध्ये या फोनची विक्री 28 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ब्लॅक, सिल्व्हर, ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शन्समध्ये येत असलेल्या या फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी सारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Honor Play 40 Plus ची वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन (Specification)

फोनमध्ये, कंपनी 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.74-इंचाचा IPS LCD पॅनेल देत आहे. हा डिस्प्ले 20:9 च्या आस्पेक्ट रेशो आणि 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये देण्यात येत असलेला हा डिस्प्ले टियरड्रॉप नॉच डिझाइनचा आहे. कंपनीने हा फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये लॉन्च केला आहे.

प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. 50 मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह 2 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येत असलेला, हा नवीनतम Honor हँडसेट 6000mAh बॅटरीने समर्थित आहे. ही बॅटरी 22.5W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 23 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ देते. जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 12 वर आधारित Magic UI 6.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 5.1, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत.