अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- शहरासह उपनगरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असताना सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध असलेल्या डॉक्टर डॉ. देवदाण कळकुंबे,
डॉ.ईकाम काटेवाले, डॉ. महेश वीर, डॉ.एस.एस.गुगळे, डॉ. सबापरवीन खान, डॉ.विवेक गांधी, डॉ.रमाकांत मरकड, डॉ.अमित पवळे आदी डॉक्टर सह सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी कोरोना काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता सामाजिक कार्य केले असे पोलीस निरीक्षक डी.एल.हटकर, वाल्मिक अण्णा कुटे,
दत्ता रणसिंग, श्रीरामपूर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे सचिव राहुल आठवाल, किरण देशमुख यांचा डॉ. संजय मोरे फाउंडेशन व भोला फाउंडेशन च्या वतीने खासदार डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, छत्रपती पुरस्कार विजेते डॉ.संजय मोरे,
भोला फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेद सय्यद, दत्ता रणसिंग, जयंत गीते, अंकित गीते, शोएब शेख, रमिस शेख, शिवा जंगम, जावेद शेख, गौस शेख, राजू थोरात, सलमान शेख, आवेज सय्यद आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले की कोरोणाच्या संकटकाळात डॉक्टरांनी अनेक ठिकाणी आपले क्लिनिक बंद केले होते
नागरिक सर्व घाबरलेल्या परिस्थितीत सर्वसामान्यांना उपचार मिळणे कठीण झाले होते मात्र या सर्व पुरस्कारार्थी डॉक्टरांनी न घाबरता सर्वसामान्य रुग्णांची सेवा अविरत चालू ठेवली तसेच कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले यामुळे शहरातील अनेक रुग्णांना मोठा आधार मिळालेला आहे
डॉक्टर म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला अशी भावना त्यांनी व्यक्त केले व सामाजिक कार्य करणारे अनेक दानशूर व्यक्तिमत्त्वाने आपले कर्तव्य पार पाडल्याचे सांगितले तर खा. सुजय विखे म्हणाले की डॉक्टर संजय मोरे फौंडेशन व भोला फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना काळामध्ये रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त करुन अभिनंदन करण्यात आले.