अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- आज कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. तसाच बदल शैक्षणिक क्षेत्रातही झाला आहे. शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण हे नवेतंत्रज्ञान शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनाही आत्मसात करणे गरजेचे झाले.
त्यामुळे तंत्रज्ञानातून शिक्षण मिळत असल्याने या नव्या शिक्षण पद्धतीचा स्विकार स्वागतार्ह आहे. हे ऑनलाईन शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये यासाठी आपण गुणवंत विद्यार्थ्यांना मोबाईल देऊन त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्वल करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
या माध्यमातून विद्यार्थ्यांनीही चांगले शिक्षण घेऊन शाळेचे, शहराचे नाव मोठे करावे, असे आवाहन अवधूत कलेक्शनचे संचालक अजित पवार यांनी केले.
केडगांव येथील भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ.10 वी व इ.12 वी मध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा अवधूत कलेक्शनच्यावतीने संचालक अजित पवार यांच्या हस्ते मोबाईल देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे, संचालक प्रसाद आंधळे, गणेश सातपुते, जालिंदर पालवे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, खंडेराव दिघे आदि उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे इ.10 वी प्रथम – आयुष सुरेश कार्ले (94.20), द्वितीय – अदित्य धनराज खोडदे (93.20), तृतीय – ओम साहेबराव दळवी (92.00) तर इ. 12 वी. प्रथम – श्रद्धा प्रकाश देवकर (84.33), द्वितीय – मिसबा नासिर सय्यद (81.17), तृतीय सोहम संदिप भुसारी (81.00) आदिंचा मान्यवरांच्या हस्ते मोबाईल देऊन गौरव करण्यात आला.
तसेच यावेळी मंथन प्रज्ञा शोध परिक्षा व ऑनलाईन वत्कृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. प्रास्तविकात प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले, शाळा ही समाजाची प्रतिकृती असल्याने येथून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे.
संस्कारक्षम पिढी हे देशाचे भवितव्य असल्याने त्यांच्या उन्नत्ती व प्रगतीसाठी विद्यालयाच्यावतीने प्रयत्न केले जात आहे. सध्याच्या कोरोना काळातही ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासपूर्ण करण्यात येत असल्याने विद्यार्थीही परिक्षांमध्ये चांगले गुण मिळवत आहे, ही महाविद्यालयाच्या दृष्टीने कौतुकास्पद बाब आहे.
दरवर्षीप्रमाणे इ.10 वी व इ.12 वी चा निकाल 100 लागल्याने शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे सांगितले. यावेळी संचालक गणेश सातपुते यांनी महाविद्यालयासाठी पिण्याच्या पाण्याची टाकी भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोसावी यांनी केले तर आभार बन्सी नरवडे यांनी मानले.