गुंडांनी लष्कराला जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईनचे काम पाडले बंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसची पिण्याचे पाईपलाईनचे काम सावेडी येथील राजकीय गुंडांनी खंडणी मिळण्याच्या उद्देशाने बंद पाडण्याच्या निषेधार्थ अर्जदार सरकारी

ठेकेदार मतीन सय्यद यानी बंद पडलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल करून काम चालू करण्यात यावे या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देऊन मागणी करण्यात आली.

एमआयडीसी येथे पिण्याच्या पाईपलाईनचे काम चालू झाले असून मुळा डॅम ते मिलिटरी इंजीनियरिंग सर्विस (भिंगार) पर्यंत काम मिळाले असून सावेडी येथील एमप्लस हॉस्पिटल जवळ काम चालू आहे.

24 मार्च रोजी संतोष काळे उर्फ ढेण्या, भैय्या साळुंखे यांनी बळजबरीने माझे काम बंद पाडले व आमच्या येथून काम करायचे असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागेल तेव्हाच काम करता येईल अशी दादागिरी करून काम बंद पाडले.

मला माझ्या कामगारांचा फोन आला असता मी त्या ठिकाणी गेलो त्यांनी माझी गचांडी धरली व शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळेस संतोष काळे व भैय्या साळुंखे हे दोघेही तेथे आले असता मी भांडण झाल्यामुळे सदरील काम बंद केले, व नंतर 17 एप्रिल रोजी काम चालू केले

तेथे माझ्या कामगारांना भैय्या साळुंखे व संतोष काळे यांनी 25 ते 30 लोक घेऊन माझे जेसीबीचे व पोकलॅण्ड च्या ड्रायव्हरला व कामगारांना जीवे मारण्याची धमकी देऊन काम बंद पाडले.

हा सर्व प्रकार तेथील हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. वरील गुंडांवर कायदेशीर कारवाई करून आम्हाला त्यांच्यापासून संरक्षण मिळावे व शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात

यावी तसेच संतोष काळे व भैय्या साळुंखे यांच्यावर संबंधित पोलिस स्टेशनमध्ये दरोडे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे इत्यादी प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून

या लोकांपासून माझे व आमच्या सर्व कामगारांचे जीवितास धोका निर्माण झाल्यामुळे त्यांच्या पासून आम्हाला संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24