टेम्पो आणि स्कॉर्पिओ जीपची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. तर यात ८ जण जखमी झाले आहेत. हा अपघात पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी फाट्यावरील वळणावर घडला आहे. नारायण श्रीकिसन निकम ( ४५, रा. नाथापूर जि.बीड) असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सुरेश महेश शिंदे, सुनील जीवन पवार, पुष्पा सुरेश शिंदे, अर्चना नारायण निकम, उर्मिला सुनील पवार, लिलाबाई मदन निकम, सीमा मिनीनाथ अबुज, सुराबाई सखाराम राऊत (सर्व राहणार नाथापूर, बीड) असे आठ लोक या अपघातामध्ये जखमी आहेत. स्कॉर्पिओ जीप मधील सर्व प्रवासी हे नाशिक या ठिकाणी देवदर्शनाला चालले होते अशी माहिती मिळाली आहे.
अधिक माहिती अशी : बीडवरून पाथर्डीकडे येणारी स्कॉर्पिओ व पाथर्डीकडून बीडच्या दिशेने जाणारा टेम्पो यांच्यात फुंदे टाकळी फाट्यावर समोरासमोर सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये नारायण निकम यांना जबर मार लागला. त्यांना पाथर्डी व पुढे नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाल्यानंतर पोलीस हवालदार भाऊसाहेब खेडकर, पोलिस कॉन्स्टेबल किरण बडे हे घटनास्थळी दाखल झाले होते. स्कॉर्पिओ जीप मधील सर्व प्रवासी हे नाशिक या ठिकाणी देवदर्शनाला चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला अशी माहिती समजली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून अपघातांची साखळी सुरूच असल्याचे दिसते. यातील मृतांची संख्यादेखील चिंताजनक आहे. वाहने चालवताना अनियंत्रित असणारा वेग, रस्त्यांची दुरवस्था किंवा इतर काही कारणे अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे दिसते.