अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे.
महाराष्ट्रात आज दिवसभरात ६३,२८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये ८०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्याचसोबत राज्यात २४ तासांत ६१ हजार ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ३९ लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे.
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८४.२४ टक्के एवढे झालं आहे. राज्यात २४ तासांत ८०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
सध्या राज्यात ४०,४३,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या एकूण ६ लाख ६३ हजार ७५८ इतकी आहे.