अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना आजही वेगवेगळे त्रास होत आहेत त्यासाठी आयुर्वेद उपचार ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी केले. श्रीरामपूर आयुर्वेद पोस्ट कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, तहसीलदार प्रशांत पाटील, डॉ. सतीश भट्टड, डॉ. महेश क्षीरसागर, डॉ. महेंद्र बोर्डे, डॉ. अमित मकवाना, डॉ. स्वप्नील नवले, डॉ. आनंद सोनवणे, डॉ. विराज कदम,
डॉ. प्रज्ञा गाडेकर, डॉ. स्वाती कबाडी, डॉ. दीप्ती गुप्ता आदी उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील पहिलेच पोस्ट कोविड आयुर्वेद हॉस्पिटल हे श्रीरामपूर येथे सुरू झाले असून त्या ठिकाणी कोविड होऊन गेल्यानंतर राहणारा थकवा,
दम लागणे, ऑक्सिजनची कमतरता भासने, दीर्घकाळ खोकला सर्दी राहणे, कान, नाक, घश्याचे विकार, त्वचा विकार, उष्णेतेमुळे होणारे मूळव्याध, फिशर,
पोटाचे आजार, फंगल इन्फेकशन, स्ट्रेस, झोप न लागणे, मानसिक तणाव आदी आजारांवर शुद्ध आयुर्वेद पद्धतीने उपचार केले जाणार आहेत.