अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा येथील सुरेगाव शिवारातून केली आहे. मिथून उंबऱ्या काळे असे त्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हॉटेल मालक आशिष चंद्रकांत कानडे (वय ३९, रा. कळंब,ता-आंबेगांब, जि- पुणे) हे त्यांच्या मालकीचे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गवरील घारगांव शिवारात असलेल्या हॉटेलमध्ये झोपलेले असताना
कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हॉटेलचे पाठीमागील जाळीची साखळी व कुलूप तोडून कानडे यांचा खून करुन हॉटेलमधील ४० हजार रुपयाची रोख रक्कम व दारुच्या बाटल्या दरोडा टाकून चोरुन नेल्या होत्या.
हा गुन्हा यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणून आरोपी सगड्या उंबऱ्या काळे (वय ३५, रा. सुरेगांव, ता-श्रीगोंदा) यास ताब्यात घेवून घारगांव पोलिस ठाण्याला हजर केलेले आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर याच गुन्ह्यातील आरोपी मिथून उंबऱ्या काळे हा फरार झालेला होता. त्याला ताब्यात घेण्याची कारवाई पथकातील पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे,
पोना सुनिल चव्हाण, पोहेकॉ बबन मखरे, पोना आण्णा पवार, पोकॉ जालिंदर माने, आकाश काळे, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर यांनी पोनि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेगांव येथून केली आहे. सदर आरोपी हा दोन खूनाच्या गुन्ह्यात फरार होता.