अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- पारनेर पोलिसांनी तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत १८ हजार २५८ रुपये किमतीच्या देशी, विदेशी दारूच्या बाटल्या तसेच ५ हजार रुपये किमतीचे गावठी दारू तयार करण्याचे साहित्य असा एकूण २३ हजार २५८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
२२ हजार ५०० रुपये किमतीचे, हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन नष्ट केले. वडझिरे गावाच्या शिवारात एकवीरा हॉटेलमध्ये दारू तसेच बिअर विकताना मानस रंजन सामल (वय २६, ओडिसा) या हॉटेल कामगाराला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
शिरापूर शिवारात हातभट्टीची तयार करण्यात येणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी २२ हजार ५०० रुपये किमतीचे हातभट्टीचे कच्चे रसायन नष्ट केले. याप्रकरणी म्हातारबा पांडुरंग येडे (शिरापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कर्मचारी गहिनीनाथ यादव यांनी फिर्याद दिली.