अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- सध्या काश्मीरमधील हिरपोरा हे गाव पहिल्या लाटेत कोविड हॉटस्पॉट होते. श्रीनगरपासून ६२ कि.मी. अंतरावर असलेल्या काश्मीर खोऱ्यातील हेच गाव, जे दुसर्या लाटेत कोरोनामुक्त असलेले एकमेव गाव आहे.
कारण या खेड्यातील लोकांनी सर्व काही सरकारवर सोडून दिले नव्हते. तर या लोकांनी ही लढाई स्वबळावर लढविली आणि शंभर टक्के लस घेऊन त्यांची मोहीम यशस्वी देखील केली आहे.
आजही देशात कोरोनाची दुसरी लाट कायम आहे. कोरोनाविरोधात सुरु असलेल्या युद्धाच्या दरम्यान, या साथीच्या रोगापासून बचाव करण्याचे सध्या फक्त चार प्रमुख मार्ग आहेत.
मास्क, सोशल डिस्टन्स, हाताची स्वच्छता आणि कोरोना लसीकरण. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्हा हे उद्दीष्ट पूर्ण करणारा पहिला जिल्हा ठरला आहे . गावचे सरपंच एजाज अहमद शेख यांनी सांगितले की ,
दक्षिण काश्मीरमध्ये प्रथम कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण दाखल करण्यात आला होता. सुमारे ७००० लोकसंख्या असलेल्या खेड्यात, नंतर प्रत्येक इतर माणसाला कोरोना साथीचा संसर्ग झाला होता.
पण आज चित्र बदलले आहे. लोकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी जारी केलेल्या नियमांचे पालन केले. मास्क घालण्यावर भर दिला, सतत सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्स याची दक्षता घेतली. त्याचबरोबर, ही मोहीम पूर्ण करण्यात सर्वानी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.