ताज्या बातम्या

Diabetes कसा होतो ? शुगर कशी वाढत जाते ? जाणून घ्या सविस्तर माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- हा प्रश्‍न त्या लोकांना नेहमी भेडसावत असतो, ज्यांच्या कुटुंबात कोणाला डायबिटीस नसतो. अनेक रुग्ण असेही असतात ज्यांचा डायबिटीस आनुवंशिक नसतो. तरीही हा रोग होऊ शकतो.

मधुमेह होण्यासाठी फक्त साखरेचे जादा सेवनच नव्हे, तर जीवनशैलीही जबाबदार आहे . डायबिटीसचा सामान्य प्रकार टाइप टू सामान्यत: वजन वाढल्यामुळे व ऐषारामी जीवनाने सुरू होतो.

शरीराच्या मेटाबॉलिजममध्ये हळूहळू बदल होत असतो. त्यामुळे त्याची लक्षणे खूप काळ दिसून येत नाहीत आणि याचे रोगी हैराण होतात.

कारण ते स्थूलता व शारीरिक निष्क्रियतेला फक्त एक स्थिती वा जीवनशैलीचा भाग मानतात. स्थूलतेचा व डायबिटीसचा खूप जवळचा संबंध आहे.

ऐषारामी जीवन आणि स्थूलतेमुळे इंशुलिनची कार्यक्षमता घटते व मधुमेहाची शक्‍यता निर्माण होते. पोटाच्या आजूबाजूच्या स्थूलतेचा इन्शुलिनच्या सक्रियते वर मोठा परिणाम होत असतो.

यामुळे अशा लोकांमध्ये मधुमेहाची शक्‍यता वाढते. जेव्हा शारीरिक श्रमाचा अभाव व स्थूलता, इंशुलिनची सक्रियता कमी करतात तेव्हा यामुळे उच्च रक्तदाब व कोलेस्ट्रॉल वाढणे सुरू होते.

जर एखाद्या पुरुषाच्या पोटाचा घेर ९0 सें.मी.पेक्षा जास्त असेल व महिलेच्या पोटाचा घेर ८0 सें.मी.पेक्षा जास्त असेल तेव्हा त्यांच्यात डायबिटीस होण्याची शक्‍यता वाढते.

अधिक रक्तशर्करेसोबत, पोटाभोवतालची स्थूलता, उच्च रक्तदाब व कोलेस्ट्रॉल जास्त असण्याच्या स्थितीला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात.

शुगर कशी वाढत जाते ? : – जेवणात असलेले कार्बोहायड्रेट्स पचताना ते ग्लुकोजमध्ये बदलून पेशींना मिळते. जेवणाचा हेतू ही हाच असतो की, पेशींना ग्लुकोज मिळावे.

जेणेकरून त्या व्यवस्थित काम करू शकतील. पेशी ग्लुकोजचा वापर इन्शुलिनच्या मदतीनेच करू शकतात. इन्सुलिन पॅनक्रियाज मधून स्रवणारे हार्मोन आहे.

जर इंशुलिनचे पुरेसे प्रमाण नसेल वा इंशुलिन पेशींवर काम करू शकत नसेल तर ग्लुकोज रक्तात पोहोचल्यानंतर पेशींना मिळत नाही

व रक्तात साचून शुगरची पातळी वाढवील. यामुळे आपल्याला थकवा जाणवेल व भूक लागत राहील. मधुमेहाचे हे एक लक्षण आहे.

आहाराचे नियोजन हवे : – डायबिटीसमध्ये आहार नियंत्रणाचा अर्थ अशा आहाराशी आहे जो संतुलित असाबा व पचनानंतर त्यातून ग्लुकोज संथपणे रक्तात पोहोचावे.

जेणेकरून इन्सुलिन हे ग्लुकोज पेशींमध्ये पाठवू शकेल. जर खूप सारे गोड खाल्ले वा ज्यात शुगर जास्त आहे

असा आहार (बर्गर, ब्रेड, मैदाची बेक्ड उत्पादने, सॉस इ.) तर नुकसान का होते जाणून घ्या. शुगर खाताच शरीरात त्वरित शोषली जाते आणि ती ब्लड शुगर पातळी एकदम वाढवते.

नंतर पॅनक्रियाज इंशुलिनद्वारे ही उच्च पातळी पेशींपर्यंत पोहोचवून पुन्हा सामान्य पातळीवर आणण्याचा प्रयत्न करते.

यासाठी प्रथम शुगर बर्स्ट जाणवते व नंतर शुगर ब्ल्यूज अर्थातच हिच्या घसरणीनंतर काहीसा थकवा. अशाप्रकारे आपण मेटाबॉलिजमला थकवा व फॅट सेल्स ही वाढतात.

साखरेला विष का म्हणतात ? : – साखर जास्त झाल्यामुळे शरीरात खनिज व हाडांचे कॅल्शियम नष्ट करते. यामुळे ऑस्टियोपोरोसिस व ऍनिमिया होऊ शकतो.

साखर दात खराब करते. यात पसरणारी ऊर्जा असते. त्यामुळे याचा मेंदूवर परिणाम होतो. चिडचिडेपणा, निद्रानाश व खिन्नता येऊ शकते.

साखर सर्वांत जास्त पॅनक्रियाज प्रभावित करते. जो अत्यंत आवश्यक हार्मोन इंशुलिनच्या सरावासाठी जबाबदार असतो. जेवणात गोडी आणण्याचे इतरही मार्ग आहेत ज्यांना मधुमेह असेल वा नसेल तेही जेवणात धान्य, शेंगा व भाज्या सामील करू शकतात. हे पदार्थ चावून खावे.

यामुळे शरीराला मिळणारी साखर सहजतेने तयार होईल आणि वेगळी साखर वा गोड खाण्याची इच्छा कमी होत जाईल. गोड व्यंजनासाठी फळे निवडावीत.

गोड भाज्या म्हणजेच गाजर, कोबी, कांदा व लालभोपळा जेवणात सामील करावा. मोड आलेली धान्ये खावीत. साखरेची लालसा आंबट, मसालेदार व तिखट चवीचे. निष्प्रभ करा.

Ahmednagarlive24 Office