अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा शहरातुन गॅस पाईपलाईन नेण्यासाठी ठेकेदारास कोणी किती लाख मागितले याची चौकशी करावी. जो दोषी असेल त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा.
आरोप करणाऱ्याने हवेत गोळीबार करण्याऐवजी नाव जाहीर करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी केले. मी श्रेय मिळावे म्हणून राजकिय जीवनात कोणतेच काम केले नाही, पाणी प्रश्न माझी जबाबदारी नाही पण मदत करण्याच्या दृष्टीने लक्ष घालत आहे.
कुकडीच्या पाणी प्रश्नी काही जण माझ्या भुमिके विषयी संशय निश्रीगोंदा शहरातुन गॅस पाईपलाईन नेण्यासाठी ठेकेदारास कोणी किती लाख मागितले याची चौकशी करावी.
जो दोषी असेल त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. आरोप करणाऱ्याने हवेत गोळीबार करण्याऐवजी नाव जाहीर करावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी केले. मी श्रेय मिळावे म्हणून राजकिय जीवनात कोणतेच काम केले नाही, पाणी प्रश्न माझी जबाबदारी नाही पण मदत करण्याच्या दृष्टीने लक्ष घालत आहे.
कुकडीच्या पाणी प्रश्नी काही जण माझ्या भुमिके विषयी संशय निर्माण करतात पण लोक त्यांना थारा देणार नाहीत प्रत्त्येकाने बोलावे पण अभ्यास करून बोलावे असा चिमटा शेलार यांनी बाळासाहेब नाहाटा यांचे नाव न घेता घेतला. राहुल जगताप हे आमदार असताना बबनराव पाचपुते हे पाणी प्रश्नी जगतापांना जबाबदार धरायचे, आता श्रीगोंद्याला पाणी देण्याची जबाबदारी आमदार बबनराव पाचपुते यांची आहे.
असा टोला शेलार यांनी लगावला आहे. डिंबे ते येडगाव कालव्याचे डिझाईनच चुकले आहे. डिंबे ते माणिकडोह बोगदाप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.र्माण करतात पण लोक त्यांना थारा देणार नाहीत प्रत्त्येकाने बोलावे पण अभ्यास करून बोलावे असा चिमटा शेलार यांनी बाळासाहेब नाहाटा यांचे नाव न घेता घेतला.
राहुल जगताप हे आमदार असताना बबनराव पाचपुते हे पाणी प्रश्नी जगतापांना जबाबदार धरायचे, आता श्रीगोंद्याला पाणी देण्याची जबाबदारी आमदार बबनराव पाचपुते यांची आहे. असा टोला शेलार यांनी लगावला आहे. डिंबे ते येडगाव कालव्याचे डिझाईनच चुकले आहे. डिंबे ते माणिकडोह बोगदाप्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.