अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशाला झोडपून काढलंय आणि अशात लशींच्या कमतरतेमुळे संकट जास्त गडद झालं आहे.
जिल्ह्यात 13 जानेवारीपासून करोना लसीकरणाला सुरूवात झालेली आहे. जिल्ह्यात गेल्या साडेचार महिन्यांत 6 लाख 15 व्यक्तींनी करोनाची लस घेतली असून यात 4 लाख 81 हजार व्यक्तींनी पहिला तर 1 लाख 33 हजार लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे.
तर दुसरीडे आतापर्यंत 6 लाख 31 हजार करोनाची लस जिल्ह्यात आलेली असून यात कोविल्डशिडचे 4 लाख 98 हजार 800 तर कोव्हिसिनचे 1 लाख 7 हजार 940 डोसचा समावेश आहे.
आतापयर्र्ंत आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभागातील 26 हजार 92 कर्मचारी यांनी पहिला तर 17 हजार 429 कर्मचार्यांनी दुसरा डोस घेतलेला आहे.
महसूल विभागातील 1 हजार 307 कर्मचार्यांनी पहिला तर 827 कर्मचार्यांनी दुसरा डोस घेतलेला आहे. पोलीस विभागातील 3 हजार 427 कर्मचार्यांनी पहिला तर 2 हजार 88 कर्मचार्यांनी दुसरा डोस घेतलला आहे.
पंचायत राज व्यवस्थेतील 3 हजार 448 कर्मचार्यांनी पहिला तर 2 हजार 57 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. गृह व शहरी कामकाज विभागातील 1 हजार 691 कर्मचार्यांनी पहिला तर 897 कर्मचार्यांनी दुसरा डोस घेतलेला आहे. 278 रेल्व कर्मचार्यांनी पहिला तर 194 कर्मचार्यांनी दुसरा डोस घेतलेला आहे.
45 ते 60 वयोगटातील आणि 60 वर्षापेक्षा जास्त असणार्या 4 लाख 45 हजार 181 यांनी पहिला तर 1 लाख 10 हजार 469 व्यक्तींनी करोनाचा दुसरा डोस घेतलेला आहे.