अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- श्रीगोंदा(प्रतिनिधी): श्रीगोंदा तालुक्यात कोरोना आजारासाठी आवश्यक असणारे उपकरणे उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.गेल्या दोन दिवसांत व्हेंटिलेटर सुविधा अभावी दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
श्रीगोंदयात दोन व्हेंटिलेटर असून ते किती तरी महिने झाले धूळ खात पडून असून प्रशासन याबाबतीत अजूनही उदासीनच दिसत आहे.
जर धूळ खात पडलेले व्हेंटिलेटर सुविधा चालू केली तर गंभीर परिस्थिती असणाऱ्या रुग्णांना तात्काळ उपचार चालू होऊन प्राण वाचण्यास मदत होईल.
म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर हे बंद पडलेले व्हेंटिलेटर मशीन सर्व सोयीसुविधा चालू करून चालू करावेत अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय अनभुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
तसेच HRCT स्कॅन सुविधाही श्रीगोंदयात उपलब्ध नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दौंड किंवा नगरला जाऊन स्कॅन करावे लागत आहे,
या सर्व प्रक्रियेला विलंब होत असल्याने रुग्णांवर उपचार होण्यास काही प्रमाणात उशीर होत असल्याने काही रुग्ण गंभीर स्थितीत जात आहेत.
या सर्व गोष्टी अक्षय अनभुले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब तसेच अहमदनगर सिव्हिल सर्जन यांना निवेदनाद्वारे आणि दूरध्वनीद्वारे लक्षात आणून दिलेल्या आहेत.
लवकरात लवकर लक्ष घालून ह्या सुविधा चालू करण्यात येतील अशी सकारात्मक चर्चा झाल्याचे अक्षय अनभुले यांनी सांगितले.