मोदींच्या अकार्यक्षम कारभारामुळे किती जणांचे नाहक बळी गेले….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदींची केवळ प्रसिद्धी आहे. लसीकरणाबाबत बोलायचं झालं तर, चार दिवस लसीकरण थांबवायचं आणि पाचव्या दिवशी रेकॉर्ड झाला म्हणून पाठ थोपटवून घ्यायची.

यामुळे किती लोकांचे जीव चाललेत. मोदींच्या व त्यांच्या टीमच्या अकार्यक्षम कारभारामुळे किती जणांचे नाहक बळी गेलेत, याचा मला वाटतं कधीच निश्चित आकडा आपल्याला कळणार नाही, अशी टीका काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

पुण्यात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले, आज चार लाखांपेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यापैकी मोदींच्या हलगर्जीपणामुळे किती जणांचा मृत्यू झाला? हे समजायला हवं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे

आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबाबत बोलतान पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “नारायण राणे मंत्री झाले त्याचं अभिनंदन. ते माझे सहकारी होते. कुणाला मंत्री म्हणून घ्यायचं आणि कुणाला घ्यायचं नाही.

कुणाला कुचकामी ठरवायचं, अकार्यक्षम ठरवायचं हा मोदींचा अधिकार आहे. काही जणांना कार्यक्षम ठरवलं आहे, काही जणांना हकलून दिलं आहे, हा त्यांचा अधिकार आहे मी त्यावर कसं बोलणार.

कुठलाही पंतप्रधान हा देशाला चांगलं प्रशासन देण्याचा प्रयत्न करत असतो, आता मोदींचा आकलनानुसार ते १२ मंत्री अपयशी ठरले. कार्यक्षम नव्हते म्हणून त्याच्या जागी त्यांनी काही नवीन माणसं घेतली आहेत आणखी काही येतील माणसं. आता ते कसं काम करतात आपण पाहूयात.

अहमदनगर लाईव्ह 24