ताज्या बातम्या

आज दिवसभरात किती एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले? ही आहे आकडेवारी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  शासनांत विलनीकरण करावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान काही कर्मचारी पगारवाढीवर समाधान मानत कामावर हजर राहिले, मात्र काही कर्मचारी अजूनही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत.

संपकाऱ्यांवर राज्य सरकारकडून निलंबनाची कारवाई सुरूच आहे. दरम्यान आज दिवसभरात 1 हजार 88 कर्मचाऱ्यांच निलंबन केल्याचं समोर आलंय. ही सर्वात मोठी निलंबनाची कारवाई आहे.

तर दिवसभरात 254 जणांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. तर आतापर्यंत तब्बल 7 हजार 585 कर्मचाऱ्यांच निलंबन केल्याचं समोर आलं आहे.

विशेष बाब म्हणजे ऐतिहासिक 41 टक्के पगारवाढ करून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं होतं,

मात्र कर्मचाऱ्यांना सरकारचा हा निर्णय मान्य नाही. या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office