ताज्या बातम्या

1 KW, 2 KW अन 3 KW सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च करावा लागतो, अनुदान किती मिळतं? वाचा….

Published by
Ahmednagarlive24 Office

Solar Panel Installation Cost : वाढत्या वीज बिलामुळे अलीकडे राज्यातील अनेक लोक सोलर पॅनल इंस्टॉल करत आहेत. सोलर पॅनल इंस्टॉल करण्यासाठी शासनाकडून अनुदान सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी केंद्रातील मोदी सरकारने पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्रातील सरकार देशातील एक कोटी घरांवर सोलर पॅनल इंस्टॉल करणार आहे.

सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी सरकारकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कमाल 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.दरम्यान आज आपण एक किलो वॅट, दोन किलो वॅट आणि तीन किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च करावा लागतो यासाठी सरकारकडून नेमके किती अनुदान मिळते या संदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती खर्च करावा लागतो ?

पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत एक किलो वॅट पासून ते तीन किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जात आहे. मात्र सोलर पॅनल इंस्टॉल करण्यासाठी सुरुवातीला ग्राहकांना खर्च करावा लागतो. खर्चाबाबत बोलायचं झालं तर एक किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी जवळपास 60000 रुपये खर्च येतो. दोन किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांचा खर्च येतो.त्याचप्रमाणे तीन किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी जवळपास एक लाख 80 हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो.

अनुदान किती मिळतं ?

पीएम सूर्यग्रह मोफत वीज योजनेअंतर्गत एक किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी तीस हजार दोन किलो वॅट संस्थेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 60000 आणि 3 किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.म्हणजे सोलर पॅनल बसवण्यासाठी निम्मा खर्च सरकारकडून मिळतो आणि निम्मा खर्च लाभार्थ्याला स्वतः करावा लागतो.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळू शकते. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. https://pmsuryaghar.gov.in या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता.

Ahmednagarlive24 Office